विहीर अणुदान 2020 नवीन वीहीर आणुदान 2020

 राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार नवीन विहिरी साठी अनुदान


सन 2020-2021 या वर्षामंध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहीरींचा लाभ देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सन 2020-2021 मंध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहीरींचा लाभ देण्यासाठी रू.58 कोटी 77 लाख इतक्या निधीच्या खर्चास प्रसासकीय मान्यता देण्यात आली आहे. असा GR 22 सप्टेंबर 2020 रोजी प्रकशीत करण्यात आला आहे

विहीर


राज्यातील अनुसूचित जाती व प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना या कार्यक्रमा अंतर्गत रू.1 लाख 50 हजार मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या बाबींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रू.2 लाख 50 हजार प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.


या योजनेअंतर्गत केवळ नवीन विहीर घटकासाठीच लाभ देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील लाभार्थ्यांची निवड यादी तसेच प्रतिक्षा यादी क्रमवारीनुसार प्रसिध्द करण्यात येणार असुन तालुका निहाय याद्यांच्या प्रती ह्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहेत तसेच सोबत संकेतस्थळावर सुध्दा प्रसिध्द करण्यात येणार आहे.


योजनेसाठी प्राप्त पात्र अर्जापैकी सोडतीव्दारे नवीन विहीरीसाठी निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांची निवड झाल्याचे सोडतीनंतर 7 दिवसाच्या आत लुखी सूचनेव्दारे कळवण्यात येणार असुन त्यानंतर लाभार्थ्यांच्या जमीनीची स्थळ पाहणी व सोबत तांत्रिक तपासणी नंतर व लााभार्थ्यांचे नवीन विहिर खोदावयाचे ठिकाण तांत्रिक दृष्ट्या योग्य आढळल्यास संबंधित लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना पूर्वसंमती देण्याची कार्यवाही सोडत झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत होणार आहे. तसेच स्थळ पाहणीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तांत्रिक दृष्ट्या अयोग्य आढळतील त्यांची निवड रद्द करण्यात येवुन प्रतीक्षा यादीतील पात्र असणाऱ्या पुढील लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.


लाभार्थी पात्रता


 लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.


 लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.


 जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.


 लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.


 उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.


 लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.


आवश्यक कागदपत्रे


नवीन विहीर याबाबीकरीता:


1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र

2) 7/12 व 8-अ चा उतारा

3) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).

4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)

5) अपंग असल्यास प्रमाणपत्र

6) तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.

7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.

8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र

9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र

10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).

11) ग्रामसभेचा ठराव.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज नमुना नं. 1

Bank of Maharashtra new atm pin generation process

प्रधानमंत्री आवास योजना गरीबांना लवकरच मिळणार घर