शरद पवार ग्राम समृद्धी योजना

 शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे उद्दिष्ट व अर्जाचा नमुना pdf डाऊनलोड

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे. 
सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येणार आहे.
 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे , कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

गाय गोठा

गाय म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे :- जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. आशा ठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. त्खायामुळे आशा ठिकाणी खाद्यासाठीचां गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाक्या बांधण्यात येतील. स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठयासाठी ७७,१८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.

शेळी पालन



शेळीपालन शेड बांधणे :- शेळ्यामेंढ्याकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रीय खत म्हणून वापरले जाऊ शकेल शेळी हि गरीबाची गाय समजली जाते. शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून १० शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही. १० शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेत मजुराला त्याचा फायदा होत नाही. हि बाब लक्षात घेता किमान २ शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल . एका शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटूंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

कुक्कुट पालन


कुक्कुटपालन शेड बांधणे :- कुक्कुट पालनामूळे ग्रामीन  भागातील कुटूंबाना पूरक उत्पादनाबरोबर आवश्यक्य पोषक अशा प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो. मात्र निवारा चांगला नसल्याने कोंबड्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे, पिल्लांचे आणि अंड्याचे प्राण्यापासून संरक्षण होते प्रत्येक शेडसाठी ४९,७६०/- रुपये खर्च अपेक्षित आहे. १०० पक्षी यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या १५० पेक्षा जास्त नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
कंपोस्ट खत


भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग :- शेतातील कचऱ्यावर कंपोष्ठींगव्दारे प्रकिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. सेंद्रिय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा  फायदा जमिनीला होतो. या नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे.



                👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज नमुना नं. 1

Bank of Maharashtra new atm pin generation process

प्रधानमंत्री आवास योजना गरीबांना लवकरच मिळणार घर